Vivo ने होम मार्केट चीनमध्ये Vivo Y500 Pro स्मार्टफोन(smartphone) लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Y-सीरीजचा एक भाग आहे, ज्याला MediaTek Dimensity 7400 चिपसेटने सुसज्ज करण्यात आले आहे. विवोच्या या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आता आम्ही तुम्हाला विवोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत.

Vivo Y500 Pro स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB + 256GB, 12GB + 256GB, 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo Y500 Pro स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 22,000 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 28,000 रुपये, 12GB + 512GB या चौथ्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवण्यात आली आहे. विवोचा हा नवीन स्मार्टफोन ऑस्पिशस क्लाऊड, लाईट ग्रीन, सॉफ्ट पावडर आणि टायटॅनियम ब्लॅक या रंगात लाँच करण्यात आला आहे.

Vivo Y500 Pro मध्ये 6.67-इंचाचा 1.5K(1,260×2,800 पिक्सेल) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,600 निट्स आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 94.10 टक्के आहे. विवोचा हा फोन ओक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7400 चिपसेटवर आधारित आहे. या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये LPDDR4X रॅम आणि UFS2.2 स्टोरेजसह Android 16 वर आधारित OriginOS 6 चा सपोर्ट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Y500 Pro स्मार्टफोनमध्ये(smartphone) डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा मेगापिक्सेलचा आहे, ज्यासोबत 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विवोचा हा फोन IP68+IP69-रेटिंगसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कनेक्टिविटीसाठी Vivo Y500 Pro स्मार्टफोनमध्ये 5जी, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ए-जीपीएस, बीडो, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, ओटीजी, वाय-फाय, नेव्हिक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

हेही वाचा :

वनरक्षकाच्या अंगावर चढला आणि… कोल्हापूरच्या नागरी वस्तीतला बिबट्याचा थरार VIDEO मध्ये कैद!
मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर!
भर रस्त्यात पँटची झिप उघडली अन्… महिला सफाई कामगाराने….