चेन्नईत घडलेल्या एका धक्कादायक पण प्रेरणादायी घटनेत, एका महिला सफाईकर्मीने आपल्या धैर्य आणि तत्परतेच्या जोरावर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. सोमवारी पहाटे अडयार पूलाजवळ 50 वर्षीय महिला सफाईकर्मी आपल्या ड्यूटीवर कार्यरत असताना, एका हेल्मेट घातलेल्या बाइकस्वार तरुणाने तिच्यासमोर थांबून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विनंती केली की तो आपली बाइक बाजूला घ्यावी, मात्र त्याने विचित्र पद्धतीने डोके हलवून अचानक आपल्या पँटची(pants) झिप उघडली. धक्कादायक प्रसंग पाहून महिलेने तत्काळ प्रतिक्रिया देत आपल्या हातातील झाडू उचलून त्या तरुणावर हल्ला केला, ज्यामुळे तो घाबरून बाइकवर बसून पळून गेला.

ही संपूर्ण घटना जवळच उभ्या असलेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाली असून, त्याचे फुटेज पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा(pants) शोध सुरू केला आहे. महिला सफाईकर्मीने सांगितले की, “हे पहिल्यांदाच घडलेले नाही. आम्ही पहाटे एकट्याच काम करत असतो, आणि अशा घटना वारंवार घडतात. प्रशासनाने आमच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.”

या घटनेनंतर चेन्नई पोलिसांनी शहरातील सर्व सफाईकर्मींसाठी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांनी त्या महिलेच्या धैर्याचे कौतुक केले आहे. तिच्या धाडसी कृतीमुळे महिलांवरील अत्याचारांविरोधात आत्मसंरक्षणाचे एक प्रभावी उदाहरण समोर आले आहे.

हेही वाचा :

धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास
तुमचा जुना फोन नंबर दुसऱ्याला गेल्यास धोका होऊ शकतो, सुरक्षेसाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या
चांदीचे दागिणे, नाणे, भांड्यांवर कर्ज मिळणार, जाणून घ्या