दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवादी(terrorist) उमरचा पहिला फोटो समोर आला आहे. त्यानेच स्फोट घडवला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि २४ जण जखमी झाले होते. मंगळवारी झालेल्या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या आय-२० कार बाहेर पडताना दिसत आहे. ती कार डॉ. मोहम्मद उमर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्फोटाबाबत पोलिसांनी सांगितले आहे की, उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे छापे सुरू आहेत आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनऊपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली आहेत.

दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात(terrorist) असे दिसून आले आहे की, डॉ. उमर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आय२० कारमध्ये तीन तास बसून राहिले. ते एका मिनिटासाठीही गाडीतून बाहेर पडले नाहीत. तसेच या कारमधून हल्ले कसे करायचे, कधी करायचे आणि कुठे करायचे याबद्दल सूचनांची वाट पाहत होते.

पोलिसांनी या स्फोटात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (यूएपीए) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघाती हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा प्रारंभिक अहवाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतरच तपासाची संपूर्ण व्याप्ती उघड होईल.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापूर्वी काही वेळातच सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक आय२० कार पार्किंगमधून जात असल्याचे दिसून आले आहे. कारमध्ये काळा मास्क घातलेला एक माणूस बसलेला आहे. उमर हा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी आहे. हल्ल्यानंतर त्याच्या आई आणि भावाला अटक करण्यात आली.

हेही वाचा :

महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता!
दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…
स्टार क्रिकेटरच्या घरावर जबरदस्त गोळीबार, व्हायरल Video मुळे क्रीडा विश्वात खळबळ