देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट(blasts) झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.

दिल्लीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, यातील बाधिकांच्या शरीराचे अवयव अक्षरश: वेगळे झाल्याचे दिसून आले. जवळच्या वाहनांच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाचा(blasts) आवाज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत ऐकू आला. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे राजधानी दिल्लीत भीतीचे वातावरण आहे. फॉरेन्सिक तपासणीत, हा स्फोट यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या आणि पद्धतशीरपणे नियोजित होता. एनएसजी, एनआयए आणि एफएसएल पथके घटनास्थळी तैनात आहेत आणि प्रत्येक पुराव्याची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी केली जात आहे.
स्फोट होण्यापूर्वीच्या प्रत्येक मिनिटाचे स्पष्ट चित्र तयार करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल नेटवर्क डेटा गोळा केला जात आहे. जवळच्या मोबाईल टॉवर्समधील रेकॉर्ड आणि ड्रोन हालचालींच्या संभाव्य खुणा देखील तपासल्या जात आहेत. लाल किल्ला केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही तर भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक देखील आहे. अशा ठिकाणी झालेल्या स्फोटावरून भीतीचे वातावरण पसरले आहे.
एनआयए आणि एफएसएल पथके वैज्ञानिक पद्धतीने प्रत्येक पुराव्याचे सखोल विश्लेषण करत आहे. जवळच्या मोबाईल टॉवर्स, रेडिओ सिग्नल आणि संभाव्य ड्रोन फ्रिक्वेन्सीवर तपास सुरू आहे. फॉरेन्सिक प्रयोगशाळा धातू आणि स्फोटकांच्या नमुन्यांचे सूक्ष्म-विश्लेषण आणि रासायनिक चाचणी करत आहेत.या स्फोटाला अत्याधुनिक म्हटले जात आहे. कारण या स्फोटात एकाच वेळी अनेक लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचे दिसून आले. वापरलेले स्फोटक अत्यंत शक्तिशाली होते, जे कमी प्रमाणात देखील मोठे नुकसान करू शकले. विशिष्ट वेळी आणि ठिकाणी अचूकपणे स्फोट होण्यासाठी रिमोट किंवा सेन्सर-आधारित ट्रिगरने हा स्फोट घडवल्याचेही संकेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून त्यांनी यासंदर्भात माहिती घेतल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री शहा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. यातील जखमी लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो.

हेही वाचा :
फक्त 3 दिवस बाकी, 5 राशींचं भाग्य उजळणार!
बिघडलेला क्रेडिट स्कोअर 1 महिन्यात वाढविला जाऊ शकतो का? जाणून घ्या
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास