बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते(actor) आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारपासून त्यांची तब्येत खालावली होती आणि अखेर मंगळवारी (11 नोव्हेंबर) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र येत्या डिसेंबर महिन्यात आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते, पण त्याआधीच त्यांनी चाहत्यांचा निरोप घेतला.

धर्मेंद्र यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि सोमवारी संध्याकाळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची स्थिती सुधारली नाहीत्यांच्या निधनाच्या वेळी कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. पत्नी हेमा मालिनी, मुलगे सनी आणि बॉबी देओल तसेच मुली इशा आणि अहाना देओल यांनी शेवटचे क्षण त्यांच्या सोबत घालवले. देओल कुटुंबीयांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाने त्यांच्या खासगीपणाचा आदर ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

धर्मेंद्र (actor)यांनी आपल्या सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत असंख्य सुपरहिट चित्रपट दिले. ‘शोले’, ‘सत्यमेव जयते’, ‘चुपके चुपके’, ‘धरम वीर’, ‘शोले’, ‘सीता और गीता’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली.धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्किस’ हा येत्या 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं — सनी, बॉबी, इशा, अहाना, अजिता आणि विजेता देओल असा परिवार आहे.

हेही वाचा :

समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर….
‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…