सोशल मीडियावर(social media) रोज हजारो मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून पोट दुखू लागते. तर काही व्हिडिओ इतके विचित्र असतात की पाहून किळस येईल, व्हिडिओ बघू देखील वाटणार नाही. सध्या एक अश्लीलतेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये स्मशानभूमीत चिता जळत असताना एका तरुणीने असे काही केले आहे की लोक तिच्याकडे पाहतच राहिले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक स्मशानभूमीत चिता जळत आहे. तिथे काही लोक उभे आहेत. याच वेळी एका ट्रक्टरवर डीजे साउड उभारण्यात आला आहे. एक तरुणी देखील या ट्रॅक्टरवर उभी राहिली आहे. ती डीजेच्या गाण्यावर नाचत आहे. तिथून जाणारे लोक तिला असे पाहून आश्चर्यचकित झाले आहे. असे वाटत आहे की कोणाच्या लग्नाची पार्टी सुरु आहे आणि तरुणी डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(social media) नेमका कुठला आहे हे स्पष्ट नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sarviind या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने अलीकडच्या पिढीला काय झाले आहे असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने कदाचित मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करत असेल असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने वाह दिदी वाह असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…
प्रत्येक भारतीयाला 3 महिन्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज…
नेहा कक्करच्या नावाने ऑनलाइन गंडा…