लग्न हे दोन जीवांचं मिलन मानलं जात. लग्नाच्या(wedding) समारंभात वर-वधू एकमेकांच्या सुखदुःखात शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडणार नाही अशी शप्पत घेतात पण तुमच्या जोडीदाराने तुमची साथ सुरु होतानाच सोडली तर काय होईल… याचा विचार करा. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एक धक्कादायक घटना घडून आली आहे, इथे एका वराचा विवाहाच्या काही तासांनंतरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निकाह झाला अन् त्याच्या काही क्षणातच आनंदमय वातावरण दुःखात बदलले. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या शनिवारी ४२ वर्षीय परवेझ आलम उर्फ ​​गुड्डूने ३३ वर्षीय साईमाशी लग्न केले. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. वधू-वरांव्यतिरिक्त दोन्ही कुटुंबे लग्नात (wedding)खूप आनंदी होती. लग्नानंतर वधू आनंदाने निघून वराच्या घरी पोहोचली. सून घरी आल्यावर संपूर्ण कुटुंब आनंदात होते. विधींनंतर वधू-वर शांतपणे घरी जातात. पण त्यानंतर जे घडते ते सर्वांसाठीच एक वाईट स्वप्न बनून राहते. माहितीनुसार, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वराला छातीत तीव्र वेदना जाणवू लागतात ज्यानंतर कुटुंबीय त्याला रुग्णालयात दाखल करतात आणि इथेच त्याचा मृत्यू होतो. दरम्यान त्यांच्या लग्नादरम्यानचा १५ सेकंदाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. व्हिडिओमध्ये वराच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसून येतो पण त्याचा हा आनंद फार काळ टिकत नाही आणि पुढे जे घडते ते अघटीत ठरते.

घटनेचा हा व्हिडिओ @hindipatrakar नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण तो ४२ नाही तर ५२ वर्षांचा दिसत आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या पत्नीने त्याला विष तर दिले नाही?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजकाल जीवाची शाश्वती देता येत नाही”.

हेही वाचा :

वनरक्षकाच्या अंगावर चढला आणि… कोल्हापूरच्या नागरी वस्तीतला बिबट्याचा थरार VIDEO मध्ये कैद!
मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर!
भर रस्त्यात पँटची झिप उघडली अन्… महिला सफाई कामगाराने….