भारताचा टी20 वर्ल्डकप 2026 कडे प्रवास अधिकृतपणे सुरू झाला असून, संघ सध्या महत्त्वाच्या तयारीच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता भारताचा संघ दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या दोन्ही मालिका भारतासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत, कारण याच मालिकांमधून आगामी वर्ल्डकपसाठी खेळाडूंची (Team India)अंतिम निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, टी20 वर्ल्डकप 2026 ही स्पर्धा भारतामध्येच तीन महिन्यांनंतर होणार असून, मागील पर्वात विजेतेपद पटकावल्यामुळे भारत पुन्हा एकदा फेव्हरेट संघ म्हणून मैदानात उतरणार आहे.

मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वक्तव्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये थोडीशी चिंता निर्माण झाली आहे. बीसीसीआयशी संवाद साधताना गंभीर यांनी स्पष्ट केले की, “आपली टीम अजून पूर्णपणे तयार नाही. आम्ही एक प्रामाणिक आणि पारदर्शक ड्रेसिंग रूम निर्माण केली आहे, परंतु वर्ल्डकपसाठी आवश्यक ती परिपूर्णता मिळवण्यासाठी अजून काही मेहनत घेणे गरजेचे आहे. पुढील तीन महिने आमच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
गंभीर यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, टीम इंडियाला अजून शारीरिक आणि मानसिक तयारी मजबूत करावी लागणार आहे. 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेनंतर, भारत 21 ते 31 जानेवारीदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर थेट फेब्रुवारीमध्ये टी20 वर्ल्डकप 2026 चा रोमांचक प्रवास सुरू होईल.
या स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया(Team India) मैदानात उतरणार आहे. तथापि, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीमुळे संघात थोडी पोकळी निर्माण झाली आहे. आता शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यावर ती उणीव भरून काढण्याची जबाबदारी असेल. त्याचबरोबर, गोलंदाजी विभागालाही अधिक स्थैर्य आणि धार देण्याची गरज असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, पुढील तीन महिने भारताच्या टी20 वर्ल्डकप मोहिमेसाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा :
प्रत्येक भारतीयाला 3 महिन्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज…
नेहा कक्करच्या नावाने ऑनलाइन गंडा…
गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार