भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अलीकडच्या विश्वचषक विजयाने देशभरातील तरुण क्रिकेटपटूंना नवचैतन्य दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू(cricket) आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनायाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती क्रिकेटच्या मैदानावर परतताना दिसते, आणि विशेष म्हणजे तिच्या हातात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अधिकृत किट बॅग आहे. त्यामुळे अनाया आगामी महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये RCB महिला संघाकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अनायाने गेल्या वर्षी लंडनमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर ती पूर्णपणे आत्मविश्वासाने महिला क्रिकेटपटू म्हणून नवा प्रवास सुरू करत आहे. याआधी ती मुंबईच्या अंडर-16 संघात आर्यन बांगर या नावाने राष्ट्रीय स्तरावर खेळली होती. त्या काळात ती भारतीय क्रिकेटर यशस्वी जयस्वाल हिच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडूंसोबत खेळली होती. आता मात्र अनाया भारतीय महिला संघासाठी खेळण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे.

तिच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती मैदानावर सराव करताना, वॉर्म-अप करताना आणि नेटमध्ये फलंदाजी करताना दिसते. तिच्या या समर्पणाची आणि मेहनतीची झलक चाहत्यांना भावली असून, सोशल मीडियावर तिचे कौतुक होत आहे. अनाया नियमितपणे क्रिकेटशी संबंधित व्हिडिओ आणि अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.

अलीकडेच अनाया “राईज अँड फॉल” या ओटीटी रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती, जिथे तिच्या प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक झाले. तिचे वडील संजय बांगर (cricket)हे भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आणि नंतर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. आता त्यांची मुलगी अनाया स्वतःच्या जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर महिला क्रिकेटमध्ये नवे पर्व लिहिण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

‘या’ मराठी अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र
कुरुंदवाडमध्ये पुन्हा भानामतीचा प्रकार…
हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध खा आणि काय बदल होतोय ते पाहा…