शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी(Investors) आनंदाची बातमी आहे. Sampre Nutritions Ltd या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या आठवड्यात एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट व्यवहाराची घोषणा केली असून, यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी बोनस शेअर्सचे वाटप केले जाणार आहे.

Sampre Nutritions Ltd च्या फाइलिंगनुसार, गुंतवणूकदारांना(Investors) खरेदी केलेल्या प्रत्येक शेअरवर एक मोफत शेअर दिला जाणार आहे. तसेच कंपनीने 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 5 रुपये इतकी होणार आहे. याचा अर्थ, कंपनीच्या स्टॉकचे लिक्विडिटी वाढेल आणि अधिक गुंतवणूकदारांना प्रवेश मिळेल.

ही कंपनीकडून पहिल्यांदाच बोनस शेअर्स जारी केले जाणार असून, ज्या गुंतवणूकदारांची नावे 14 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असतील, त्यांनाच बोनस आणि स्प्लिटचा लाभ मिळेल.शुक्रवारी कंपनीच्या शेअरची किंमत 2% नी घसरून 138.60 रुपये झाली होती. गेल्या दोन आठवड्यांत शेअरमध्ये 16 टक्क्यांची घसरण झाली असली तरी, या शेअरने तीन महिन्यांत तब्बल 132% परतावा दिला आहे. पोजिशनल गुंतवणूकदारांसाठीही हा शेअर फायदेशीर ठरला असून, त्यांना 51 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

या शेअरची एक वर्षातील सर्वाधिक किंमत 169.30 रुपये आणि कमी किंमत 20.90 रुपये इतकी आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 291 कोटी रुपये इतके आहे. Sampre Nutritions Ltd च्या या निर्णयामुळे लघु गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीमध्ये विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली…
धनंजय मुंडे बोगस मतदानावर आमदार? माजी नगराध्यक्षाचे गंभीर आरोप
सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral