आजच्या काळात क्रेडिट (credit)स्कोअर ही व्यक्तीच्या आर्थिक जबाबदारीची सर्वात मोठी खूण बनली आहे. हा स्कोअर एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक इतिहासाचे प्रतिबिंब असतो. त्यावरून बँका आणि वित्तीय संस्था ठरवतात की त्या व्यक्तीस कर्ज द्यायचे की नाही, आणि दिल्यास कोणत्या व्याजदराने.

चांगला क्रेडिट स्कोअर — आर्थिक आरोग्याचे प्रतीक
क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्याहून जास्त असेल, तर तो उत्कृष्ट मानला जातो. 600 ते 700 हा मध्यम श्रेणीचा स्कोअर आहे, तर 300 ते 500 दरम्यानचा स्कोअर(credit) वाईट समजला जातो. चांगला स्कोअर असलेल्या व्यक्तीस बँका कमी व्याजदरावर कर्ज मंजूर करतात.

1 महिन्यात स्कोअर वाढवणे कठीण, पण सुरुवात शक्य!
तज्ज्ञांच्या मते, खराब क्रेडिट स्कोअर फक्त एका महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढवणे शक्य नाही. परंतु, नियमित सवयींमुळे एका महिन्यात थोडी सुधारणा दिसून येऊ शकते. पूर्ण सुधारणा साधण्यासाठी किमान 6 महिन्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतो.

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी उपयुक्त टिप्स:

सर्व बिले आणि EMI वेळेवर भरा

क्रेडिट कार्डचा वापर मर्यादेत ठेवा

वारंवार कर्जासाठी अर्ज करू नका

जुने कर्ज फेडल्यावर खात्री करा की त्याची नोंद योग्य प्रकारे अपडेट झाली आहे

क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% पेक्षा कमी ठेवा

उशिरा पेमेंट केल्यास दंड आणि नुकसान दोन्ही!
बरेच लोक कमी क्रेडिट युटिलायझेशन राखतात, पण पेमेंट वेळेवर करत नाहीत. त्यामुळे स्कोअर कमी होतो आणि दंडही भरावा लागतो. म्हणूनच, वेळेवर पेमेंट करणे हीच क्रेडिट स्कोअर सुधारण्याची गुरुकिल्ली आहे.

हेही वाचा :

समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर….
‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…