बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक बातमी समोर आली आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांच्या आरोग्याची स्थिती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर(ventilator) हलविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सध्या डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांची प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी किंवा रुग्णालय प्रशासनाने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तरीही, चाहत्यांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते आणि सहकलाकार धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दहा दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय टीमने ती फक्त पूर्वनियोजित तपासणी असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांची तब्येत अचानक खालावल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
धर्मेंद्र यांना यापूर्वीही आरोग्याशी संबंधित काही अडचणींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते नेहमीच आपल्या फिटनेस आणि जीवनशैलीबाबत जागरूक राहिले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी उपचारासाठी अमेरिकेला देखील भेट दिली होती.‘बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र(ventilator) गेल्या सहा दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’ आणि ‘यादों की बारात’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी त्यांना अमर स्थान मिळवून दिले आहे. सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘इक्कीस’ डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.चाहत्यांना आता पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचा उत्साही आणि निरोगी अवतार पाहायचा आहे, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
‘टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया तयार नाही…
प्रत्येक भारतीयाला 3 महिन्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज…
नेहा कक्करच्या नावाने ऑनलाइन गंडा…