राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर(MLA) गंभीर आरोपही केले आहे. त्यांच्या प्रवेशा वेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड हेदेखील उपस्थित होते.दरम्यान, परळीतील अर्धवट विकासकामांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपे दीपक देशमुख यांनी केले आहेत. सुरुवातील गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील परस्पर वादामुळे माझे तिकीट कापले गेले, त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो, याचे कोणी श्रेय घेण्याचे काम नाही.

परळीत अर्धवट विकासकामांमळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांपासून मी काम करतो होते. लोकसभा निवडणुकीत मी पंकजा मुंडेंसाठी काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंसाठी काम केले. पण परळीत सुरू असलेल्या बोदस मतदानाबाबत मी धनंजय मुंडेंना(MLA) मी सांगितलं होतं की आपण निवडून येऊ, पण हे प्रकार थांबवले पाहिजेत. पण त्यावर त्यांनी काहीही काम केलं नाही. मी गेल्या दीड महिन्यापासून प्रचार सुरू केला असून आता परळीतील जनताही माझ्यासोबत आहे, असं दीपक देशमुख यांनी सांगितलं.

परळीत सुरू असलेल्या बोगस कामांचा प्रकार मी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सांगितला होता. एकदानाही तर तीन वेळा त्यांना सांगितला होता.पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यात सगळी मिलीभगत असल्याने मी शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हजारो कोटींचा निधी मिळूनही परळीत कुठलेही काम पूर्ण झाले नाही. तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कामही अर्धवट आहे. धनंजय मुंडे सगळा कारभार बंगल्यावर बसून केला, असा आरोपही त्यांनी केला.

“परळीत सगळे आम्हाला ‘अर्धवटराव’ म्हणतात, कारण नगराध्यक्ष असताना धनंजय मुंडे यांनी आम्हाला काम करू दिलं नाही. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलोय, म्हणजे अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करणार,” असं सांगताना माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.

देशमुख म्हणाले, “नगरपरिषदेतून कोट्यवधी रुपयांच्या टेंडरच्या फाईली गायब आहेत. त्यामुळे हजारो कोटी रुपयांची कामं अर्धवट राहिली आहेत. धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आले आहेत. विधानसभेला त्यांना जेवढी मतं मिळाली होती, ती आता मिळतायत का ते बघा. आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांतील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले आणि त्याच कार्यकर्त्यांनी जाऊन बोगस मतदान केलं.” या आरोपांनंतर परळीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.

परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. मी पक्षनिष्ठ नाही नसून व्यक्तीनिष्ठ माणूस आहे. त्यामुळे मी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे दीपक देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांचा प्रवेश धनंजय मुंडे यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral
अनायाची नवी इनिंग; क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक…
‘या’ मराठी अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र