मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (president) यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं बोललं जात होतं, मात्र आज अचानक त्रास वाढल्यामुळे त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाणार आहे.

आज सकाळपासूनच शरद पवार (president) यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांची तपासणी होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर काय उपचार करायचे ते ठरवलं जाणार आहे. जर गरज वाटली तर त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून घेतलं जाईल, परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी