कोल्हापुरातील चंदगड नगरपंचायतीसाठी काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी चंदगड विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाविरोधात मोट बांधली आहे(leader).

दरम्यान कोल्हापुरानंतर आता पुण्यातही हा पॅटर्न अवलंबला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात किंवा जेजुरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असं विचारलं असता कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांचं मत ऐकलं जात आहे. या भावनेचा आदर करु”.
“महायुती(leader) म्हणून सोबत आहोत. पण कार्यकर्त्याचा, परिसराचा, गावाचा,नगरपालिकेच्या हद्दीतील परिस्थितीचा विचार करुन राष्ट्रवादीच्या जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी योग्य तो निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घेतील,” असंही त्यांनी म्हटलं आहे. “स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितलें आहे त्याचा सूचना ऐकून घेतल्या जात आहेत. भाजप सेना राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करावी अशाही सूचना येत आहेत. अजून मुलाखती सुरू. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित आणण्याबाबत चर्चा सुरू आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान तळेगाव नगरपरिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. या युतीबाबतच शिक्कामोर्तब मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. आज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर यावर्षी प्रथमच तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 17 जागांवर तर भाजप 11 जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे.

हेही वाचा :
रोहित-विराटला विजय हजारे ट्रॉफीत खेळावेच लागले…
अंबाबाई, जोतिबा मंदिरसह आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापुरात सुरक्षा यंत्रणेत वाढ
पेन्शनर्सना मोठा धक्का बसणार…