बातमीचा मथळा वाचून हा हसण्यासारखा विषय वाटत असला तरी परिस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध आहे. या पत्रातील प्रत्येक शब्द ग्रामीण महाराष्ट्रातील दाहकता दर्शवणार आहे. नेमकं पत्रात (situation)म्हटलंय काय पाहूयात..गावात लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. शिक्षण, नोकरी, शहरांकडे वाढता ओढा आणि बदलते सामाजिक गणित या सगळ्यात ग्रामीण भागातील अनेक तरुण आयुष्याच्या एका फार कठीण टप्प्यावर उभे आहेत.अशाच एका तरुणाने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहून आपली व्यथा सांगितली आहे.

काही दिवसांपूर्वी अकोलात शरद पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला, यानंतर अनेकांनी आपले निवेदन शरद पवार यांना दिले . मात्र या गर्दीत अकोल्यातील एका 34 वर्षीय(situation) तरुणाचाही समावेश होता. या तरुणीने शरद पवारांना लिहिलेल्या पत्रातील शब्द अन् शब्द वाचून कोणीही हेलावून जाईल. “माझं वय वाढतंय, पण अजून लग्न झालेलं नाही. भविष्यात माझं काही होणार नाही, मी एकटाच राहीन,” असं या पत्रात तरुणाने शरद पवारांकडे परिस्थितीबद्दल भाष्य करताना लिहिलेलं आहे.

“तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला एक पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही!” या तरुणाने शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात पुढे लिहिलं आहे.“मी गरीब कुटुंबातून आहे. सामाजिक बंधनं आणि परिस्थितीमुळे कोणीच आपली मुलगी द्यायला तयार नाही. पण मला संसार हवा आहे, आपलेपणा हवा आहे. कृपया माझ्या विनंतीचा विचार करा,” असं पत्रात म्हटलं आहे. या पत्राने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. कारण ही फक्त एका तरुणाची हाक नाही,तर ग्रामीण भारतातील असंख्य अविवाहित तरुणांच्या अंत:करणातील वेदना आहे.

हेही वाचा :

तुमचीही सारखी झोपमोड होतेय? ही सवय तुमच्या हृदयासाठी ठरु शकते घातक
चीन आणि तिबेटला जोडणारा ‘Hongqi Bridge’ पडल्यानंतर बनला जगभरात चर्चेचा विषय; VIRAL VIDEO मुळे माजली खळबळ
देशातली सर्वात स्वस्त कार, आयफोनच्या किमतीत आणा घरी…