कार खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जीएसटीमध्ये घट केल्यानंतर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ‘ईव्ही’ आता फक्त 3.25 लाख रुपयांपासून खरेदी करता येणार आहे. ही कार (electric car)दोन व्यक्ती आणि एक लहान मुल आरामात बसून प्रवास करू शकते. विशेष म्हणजे, ईव्हीमध्ये सोलार पॅनल दिला आहे, ज्यामुळे सूर्यप्रकाशाच्या मदतीने कारला चार्जिंग करता येते.

ईव्ही इलेक्ट्रिक कार फक्त पाच सेकंदांत शून्य ते चाळीस किमी प्रति तास वेग गाठू शकते. या कारचे तीन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत – नोव्हा, स्टेला आणि व्हेगा. नोव्हा मॉडेलची किंमत 3.25 लाख रुपये असून, एकदा चार्जिंग केल्यास ही कार 250 किमी प्रवास करू शकते. स्टेला मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये असून, एकदा चार्जिंग केल्यास 800 किमी प्रवास करता येतो. तर व्हेगा मॉडेलची किंमत 4.49 लाख रुपये असून, ही कार(electric car) एका चार्जमध्ये 1200 किमी प्रवास करण्यास सक्षम आहे.

सर्व मॉडेल्समध्ये एका किलोमीटरसाठी फक्त दोन रुपये खर्च येतो, ज्यामुळे प्रवास अत्यंत किफायतशीर ठरतो. गर्दीच्या ठिकाणातून सहजपणे बाहेर पडण्यासाठी ईव्ही कारची रचना खास केली गेली आहे. या स्वस्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कारमुळे कारमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न साकार होणे आता अधिक सोपे आणि परवडणारे झाले आहे.

हेही वाचा :

चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral
गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च हसत हसत दिले हेल्थ अपडेट म्हणाला, ”डॉक्टरांनी मला..”
कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! स्मशानभूमी आणि घरात बायकांना झोपवून चुटकी वाजवायचा अन्….