जर तुम्ही गुगलचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन(smartphone), पिक्सेल 10 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या Amazon वर मोठ्या सूटसह हा फोन खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. भारतात 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला पिक्सेल 10 आता 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या इंडिगो व्हेरिएंटवर 11,721 रुपयांची सूट मिळत असून, त्याची किंमत 68,278 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय, निवडक क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सूट आणि जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून बचत वाढवण्याची संधी देखील आहे.

गुगल पिक्सेल 10 मध्ये टेन्सर जी5 चिपसेट असून 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 4,970 एमएएच बॅटरी असून 30 वॅट फास्ट चार्जिंग आणि 15 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.3 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो, तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन देखील आहे.

फोटोग्राफीसाठी पिक्सेल 10 मध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मॅक्रो(smartphone) फोकससह, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 10.8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे जो 5x ऑप्टिकल झूम देतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10.5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. अशा उत्कृष्ट फीचर्ससह आणि सध्या मिळालेल्या सूटसह पिक्सेल 10 हा स्मार्टफोन खरेदीसाठी आकर्षक पर्याय ठरतो.

हेही वाचा :

करिश्मा कपूरच्या मुलांची फी दोन महिन्यांपासून थकली, थेट कोर्टात अर्ज, अमेरिकेतील विद्यापीठात..
२०२६ मध्ये सोन्याच्या किंमती काय असणार; आकडेवारी आली समोर
बिहार जिंकताच भाजपाने आपल्याच ज्येष्ठ नेत्याला पक्षातून हाकललं