नोव्हेंबर महिन्यात तुळशी विवाहानंतर देशभरात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या कालावधीत नेहमीप्रमाणे सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून येतात. मात्र या वर्षीची परिस्थिती काहीशी वेगळी असून सोन्याचे दर आधीच उच्चांक गाठत आहेत. सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख वीस हजार रुपयांच्या आसपास असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या मागणीतही(price) वाढ होते आणि त्याचा थेट परिणाम दरांवर होतो. दरम्यान, सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील काही महिन्यांत सोन्याचे रेट मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज मांडला आहे. गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती लाभदायक असली तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खर्चात वाढ निश्चित आहे.

दिवाळीनंतर सोन्याच्या किमतींमध्ये (price)दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली. प्रारंभी थोडी घसरण आणि चढ-उतार दिसले, मात्र नंतर सोन्याने पुन्हा वाढती गती पकडली. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढती मागणी. दिवाळीतच जवळपास 40 ते 50 टक्के ग्राहकांनी जुने दागिने एक्सचेंज करून नवीन सोने खरेदी केले.आता पुन्हा लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तज्ञांच्या मते, पुढील तीन ते चार महिन्यांत सोने एक्सचेंजचे प्रमाणही 20 ते 30 टक्क्यांनी वाढू शकते. मागणी वाढली की किमती वाढणे स्वाभाविक आहे, आणि यंदा तेच स्पष्टपणे दिसत आहे.
सध्या सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी साधारणतः 1,25,000 रुपये आहे. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काळात यात आणखी 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच ग्राहकांना 10 ग्रॅम सोन्यासाठी किमान 25,000 रुपयांनी जास्त रक्कम मोजावी लागू शकते. वाढत्या मागणीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, आर्थिक चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळेही सोन्याचे रेट उच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.आर्थिक तज्ञांच्या मते, सोने हे सुरक्षित गुंतवणूक साधन असल्याने त्याची मागणी वर्षानुवर्षे वाढत आहे. विशेषत: राजकीय घडामोडी, महागाईदर आणि ग्लोबल मार्केटमधील अस्थिरतेच्या काळात सोने अधिक महत्त्वाचे ठरते. याच सर्व घटकांचा परिणाम 2026 च्या सोन्याच्या दरांवर जाणवणार आहे.

हेही वाचा :
1 डिसेंबरपासून बंद होणार SBI ची ही प्रसिद्ध सेवा
कसोटी क्रिकेटमध्ये हा क्रिकेटर बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’,
१८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहिण योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य