दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मृत्यूपत्राशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यावर करण्यात आला असून हे प्रकरण थेट(fees) कोर्टात पोहोचले आहे. अशातच संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांची मुलं — समायरा आणि कियान — यांनीही आपल्या हक्कासाठी न्यायालयात अर्ज दाखल करत संपत्तीतील अधिकाराची मागणी केली. त्यानंतर प्रिया कपूर यांनी करिश्मा कपूरवरच आरोप करत वाद आणखी तीव्र केला. संजय कपूर यांच्या आईनेही प्रियावर छेडछाड आणि संपत्ती बळकावण्याचे आरोप करून प्रकरणात नवा वळण आणला आहे.

या सर्व गदारोळात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. करिश्मा कपूर यांच्या मुलीची अमेरिकेतील दोन महिन्यांची फीस (fees)भरली गेली नसल्याचा आरोप कोर्टात करण्यात आला. करिश्माच्या मुलांच्यावतीने वकिली करणारे महेश जेठमलानी यांनी सांगितलं की, संजय कपूरने घटस्फोटावेळी मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचे मान्य केले होते आणि संजय यांचे निधनानंतर ही जबाबदारी प्रियाकडे जाते. मात्र प्रिया कपूरच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावत मुलांचा संपूर्ण खर्च प्रिया उचलत असल्याचा दावा केला.
फीसच्या वादावरून सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी दोन्ही पक्षांना चांगलेच फटकारले. “हे वैयक्तिक मुद्दे कोर्टात नाटकीपणे आणू नका,” असे सांगत त्यांनी सुनावणी तटस्थ ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच, मुलांच्या फीस आणि जबाबदारी प्रिया कपूर यांच्या वकिलांनी वेळेवर पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. संजय कपूर यांच्या संपत्तीच्या विवादाला आता आणखी गुंतागुंतीचे वळण लागले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :
1 डिसेंबरपासून बंद होणार SBI ची ही प्रसिद्ध सेवा
कसोटी क्रिकेटमध्ये हा क्रिकेटर बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’,
१८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहिण योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य