आनंदी, सुखी आणि उत्साही आयुष्य जगत असलेल्या कुटुंबावर कोणत्या क्षणी संकट कोसळेल, हे कधीच सांगता येत नाही. अशाच अनपेक्षित दु:खाने एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या कुटुंबाला हादरवून सोडले आहे. अवघ्या 30 वर्षांच्या तरुण वयात या उदयोन्मुख अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला असून, त्याच्या अचानक निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अभिनेता धनंजय कोळी यांचा रस्ते अपघातात (accident)मृत्यू झाला आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात धनंजय यांच्यासह कारमध्ये असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन ट्रकच्या मध्ये कार अडकल्याने झालेल्या या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

धनंजयच्या निधनाचे सर्वांत मोठे दुःख त्याच्या कुटुंबावर कोसळले आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्याच्या पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला होता. दुर्दैवाने या निरागस बाळाच्या आयुष्यात आता वडिलांचे प्रेम कायमचे हरपले आहे. अपघाताच्या वेळी धनंजय पुण्यात होता, तर त्याची पत्नी आणि बाळ लातूरमध्ये होते. त्याचे आई-वडील देखील पुण्यातच राहात होते.मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा असलेला धनंजय व्यवसाय सांभाळत असतानाच अभिनयाची आवड जोपासत होता. त्याने अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या, तसेच सोशल मीडियावर तो स्वतःचा उल्लेख ‘अभिनेता’ असा करत असे. काही दिवसांपूर्वीच त्याने पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते—आणि तीच त्याची शेवटची पोस्ट ठरली.

नातलगांनी व्यक्त केलेल्या भावना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. “तीन महिन्यांच्या मुलाचे वडिलांवरचे प्रेम हिरावून घेतले गेले… धनंजयचा हकनाक बळी गेला,” असे कुटुंबीयांनी दुःखद शब्दांत म्हटले.आनंदाच्या क्षणांनी भरलेल्या जीवनात अचानक आलेल्या या अपघाताने(accident) कोळी कुटुंबावर अकल्पित अंधार पसरला आहे, आणि नाटकसृष्टीतील एक उदयोन्मुख कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

हेही वाचा :
शाळेतून घरी आली आणि…,14 वर्षीय मुलीने 19व्या मजल्यावरून मारली उडी
मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?
धीरेंद्र शास्त्रींची तब्येत खालावली; रस्त्यावर कोसळले, जाणून घ्या नेमकं काय झालं?