कल्याण मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने थेट १९ व्या मजल्यावरून उडी(jumps) घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव रिद्धी खराडे असे आहे. ही घटना हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. धक्कदायक म्हणजे हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या बहिणी समोर घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे असून इमारतीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.रिद्धी खराडे नावाची मुलगी उल्हासनगरातील एका बड्या नामांकित शाळेत शिकते. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रिद्धी हिचा आज शाळेत ओपन डे होता. तिने जी परिक्षा दिली होती, तिला त्याचे मार्क्स दाखविले गेले. ती सकाळी शाळेत गेली होती. शाळेतून ती दुपारी घरी परतली. शाळेतून आल्यानंतर ती चिंतेत होती. शाळेतील ओपन डे कार्यक्रमास तिची बहिणीही गेली होती.

तिची आई ठाण्याला कामाला असल्याने ती कामावर गेली होती. ती तिच्या आई बहिण आणि आजीसोबत राहते. शाळेतून तिला टेन्शन आले. तिने तिच्या बहिणीसमोरच 19 व्या मजल्यावर उडी (jumps)मारुन तिचे जीवन संपविले. या घटनेमुळे रौनक सिटी परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा सर्व प्रकार तिच्या मोठया बहिणीसमोर घडला. लोक जमा झाले. खडकपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

तो पर्यंत रिद्धीचे नातेवाईक तिला घेऊन नेमके कोणत्या रुग्णालयात गेले याची माहिती कोणालाच नव्हती. थोड्याच वेळात मुलीची आई आणि बहिण समोर आल्या आणि घटनेची माहिती मिळाली.पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. परिक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मात्र पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?
धीरेंद्र शास्त्रींची तब्येत खालावली; रस्त्यावर कोसळले, जाणून घ्या नेमकं काय झालं?
राज्यात थंडीची लाट! ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी