दक्षिण मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३५ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर तिच्याच मालकाच्या विवाहित ड्रायव्हरने बलात्कार केल्याचा सनसनाटी प्रकार समोर आला आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून वारंवार ब्लॅकमेल(hotel) करत तिला अत्याचाराला बळी पाडल्याचा आरोप आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही बिहारमधील रहिवासी असून, एमआरए मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये आरोपीने धार्मिक विधी करण्याचे कारण सांगून पीडितेला फोर्ट येथील एका हॉटेलमध्ये (hotel)नेले. तिला ड्रग्ज मिसळलेले पेय पाजून तो बेशुद्ध पडताच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या दरम्यान आरोपीने फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले.

यानंतर या आक्षेपार्ह व्हिडिओंचा आधार घेत आरोपीने पीडितेला धमकावत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अमानुष वागणूक दिली जात होती. अखेर मानसिक त्रास सहन न झाल्याने महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण घटना सांगितली.

पीएसआय अनिल राठोड व पीएसआय वसंती जाधव यांच्या नेतृत्वाखाली एमआरए मार्ग पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला बालेश्वर येथून अटक केली. आरोपीकडील मोबाईल आणि फोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा :

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…
कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’
धर्मेंद्र ICU video लीक प्रकरण: पोलिसांची धडक कारवाई!