बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीच्या प्रवाहावरून पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, कारण एनडीए आणि महाआघाडीच्या जागांमध्ये मोठे अंतर (vote)निर्माण झाले असून ते भरून काढणे जवळपास अशक्य मानले जात आहे. या निवडणुकीत राजकारण्यांसह भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनीही मोठ्या उत्साहात आपले नशीब आजमावले आहे. खेसारी लाल यादव, रितेश पांडे, पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांच्यासह प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

बिहारमध्ये लोकगीतांसाठी प्रचंड लोकप्रिय असलेल्या मैथिली ठाकूर यांना भाजपने अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, प्रचाराच्या काळात त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मतमोजणीच्या(vote) सुरुवातीच्या राऊंडपासूनच त्या आघाडीवर असून, त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. आघाडीबद्दल समाधान व्यक्त करताना मैथिली म्हणाल्या की, “मला माझं यश दिसतंय, पण अंतिम विजयी प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी पूर्णतः संतुष्ट होणार नाही.” काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचा गैरसमज झाल्याने मैथिली देशभरात चर्चेत आल्या होत्या.

मतदारसंघाच्या ब्लूप्रिंटबाबत विचारलेला प्रश्न तिने चित्रपटाच्या ब्लूप्रिंटशी संबंधित समजत ‘ही वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे’ असे उत्तर दिले होते. दुसरीकडे, भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवही छपरा मतदारसंघातून(vote) आरजेडीच्या तिकीटावर जोरदार लढत देत आहेत. या स्टार उमेदवारांमुळे बिहारची निवडणूक अधिक रंगतदार बनली असून निकालाकडे राज्याबरोबर देशाचाही श्वास रोखला गेला आहे.

हेही वाचा :

धीरेंद्र शास्त्रींची तब्येत खालावली; रस्त्यावर कोसळले, जाणून घ्या नेमकं काय झालं?
राज्यात थंडीची लाट! ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा, नोट करून घ्या रेसिपी