प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर त्यांच्या सोशल मीडियावर सतत काहींना काही नवनवीन रेसिपी चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्यांच्या रेसिपी (recipe)अतिशय सोप्या आणि कमीत कमी पदार्थांमध्ये तुम्ही बनवू शकता. जेवणात मुलांना कायमच चपाती, भाकरी किंवा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

हा पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांसोबत किंवा चिकन, मटण सोबत सुद्धा खाऊ शकता. लच्छा पराठ्याचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता. कायमच चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर गार्लिक लच्छा अतिशय उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना लसूण खायला अजिबात आवडत नाही.त्यामुळे लसूण पासून तुम्ही या पद्धतीने कोणताही इतर पदार्थ सुद्धा बनवू शकता. चला तर आणून घेऊया चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

लसूण
भिजवलेल गव्हाचं पीठ
हिरवी मिरची
चाट मसाला
धणे पावडर
कोथिंबीर
तूप

कृती:

चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूणची(recipe) साल काढून लसूण बारीक चिरून घ्या.ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडस तेल घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा करून चपाती लाटून घ्या. त्यानंतर लाटलेल्या पोळीवर तूप, चाट मसाला, धनेपूड, कोथिंबीर,बारीक चिरलेली लसूण आणि मिरची घालून हाताने मिश्रण सगळीकडे पसरवा आणि चपातीचा रोल करून घ्या.

रोल केलेला पिठाचा गोळा न विस्कटता पिठात घोळवून हलक्या हाताने लाटून घ्या. गरम तव्यावर पराठा शेकण्यासाठी ठेवा.दोन्ही बाजूने पराठा शेकल्यानंतर त्यावर तूप घालून पुन्हा एकदा खरपूस भाजा.तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिली गार्लिक लच्छा पराठा. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल.

ही वाचा :

हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने घेतलं श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह अनेकांची नावं
सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका