राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडत आहे. वातावरणातील गारव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शरीराला आजारांची लागण होण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार झाल्यानंतर शरीरात हळूहळू अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कायमच शरीराला ऊब मिळेल अशा पौष्टीक पदार्थांचे(laddus) सेवन करावे. आहारात काही प्रमाणात उष्ण पदार्थ खावेत. यामुळे पोटात निर्माण झालेली थंडी कमी होऊन शरीराचे तापमान संतुलित राहील. थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त भूक लागते. कितीही पदार्थ खाल्ले तरीसुद्धा ते कमीच वाटतात.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक डिंकाचे लाडू (laddus)बनवण्याची सोपी रेसिपी आणि योग्य प्रमाण सांगणार आहोत. कारण कोणतेही लाडू बनवण्याआधी योग्य प्रमाणात साहित्य घेतल्यास लाडूची चव अतिशय सुंदर लागते. तसेच लाडू दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतात.डिंकाचे लाडू चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक डिंकाचा लाडू खाल्ल्या पोट कायम भरलेले राहील आणि लवकर भूक लागले. डिंकाच्या लाडूचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल. हे लाडू बनवताना साखरेचा वापर न करता गूळ किंवा डिंकाचा वापर करावा.
साहित्य:
डिंक (वाटीभर)
गूळ (वाटीभर)
गव्हाचं पीठ (वाटीभर)
सुक खोबर(अर्धा वाटी)
सुका मेवा (अर्धा वाटी)
वेलची पावडर (चवीनुसार)
खसखस (चवीनुसार)
तूप (चवीनुसार)
कृती:
पौष्टिक डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्या. पीठ कायमच मंद आचेवर भाजावे.गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्या. त्यानंतर त्यात सुका मेवा आणि डिंक भाजून फुलवून घ्या. त्याच कढईमध्ये खसखस सुद्धा भाजा.डिंक थंड झाल्यानंतर हाताने हलकासा बारीक करून घ्या. यामुळे लाडूची चव सुंदर लागते.
कढईमध्ये पाणी गरम करून पाण्याला उकळी काढा आणि त्यात आवश्यकतेनुसार गूळ घालून पाक तयार करा.मोठ्या भांड्यात भाजून घेतलेले गव्हाचं पीठ, बारीक केलेला डिंक, सुका मेवा, खसखस, वेलची पावडर आणि तयार केलेले गुळाचे मिश्रण घालून मिक्स करा.सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हातांना तूप लावून लाडू बनवून घ्या.तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक डिंकाचे लाडू.

हेही वाचा :
AI चॅटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral
बिहार निवडणुकीत १०,००० रुपयांनी ‘गेम’ पलटला! राजकीय वर्तुळात चर्चा
दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार