हिवाळ्यात(winter) वरण–भातासोबत लोणचं खाण्याची प्रथा अनेकांच्या जेवणात महत्वाची आहे. बाजारात विविध प्रकारची लोणचं मिळत असली तरी अनेक जण घरगुती लोणचं बनवण्यास प्राधान्य देतात. गाजर, मुळा, कोबी, आवळा अशा भाज्यांचे लोणचे हिवाळ्यात विशेष लोकप्रिय असतात आणि लोक ते वर्षभर साठवतात. घरगुती लोणचं तयार करण्यासाठी भाज्या धुऊन, चिरून, उन्हात वाळवली जातात, नंतर मसाले व तेल घालून योग्य चव येईपर्यंत ठेवले जाते.

तज्ज्ञांचे मत आहे की घरगुती लोणचं केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जयपूर येथील आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता म्हणतात की, लोणचं खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 12 मिळते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि पचनक्रियेला मदत होते. लोणच्यामध्ये मोहरी, मेथी व इतर मसाले वापरले जातात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
तरीही काही परिस्थितींमध्ये (winter)लोणचं टाळावे. पित्ताचे प्रमाण जास्त असलेल्यांनी, अतिसार, उलट्या, आम्लपित्त, छातीत जळजळ, मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृत, हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी लोणचं मर्यादित प्रमाणात किंवा टाळावे. गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी देखील लोणचं सुरक्षित नाही.
घरच्या लोणचं बनवणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरते, कारण बाजारातील लोणच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज व जास्त मीठ–तेल वापरले जाऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. त्यामुळे दर्जेदार घटक वापरून घरगुती लोणचं बनवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात, ज्यामुळे जेवणाचा अनुभव स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण होतो.

हेही वाचा :
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही?
EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! ₹७ लाखांपर्यंतचा विमा मिळणार मोफत
मला घोडे लावा… लेकीच्या कपड्यांच्या बातम्या पाहून भडकले इंदूरीकर महाराज