वनडे वर्ल्डकप 2027 च्या तयारीसाठी टीम इंडियाच्या मोर्चेबांधणीची प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू महत्त्वाचे ठरतील. वनडे वर्ल्डकपपर्यंत अजून दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असून, त्याआधी दोन्ही खेळाडू काही निवडक वनडे मालिकांत दिसणार आहेत. मात्र, मालिकांचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे निवड समितीला त्यांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट, विशेषतः विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Trophy)खेळण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे ते फिट राहतील आणि वनडे फॉर्मेटसाठी संघात आपली जागा सुनिश्चित करू शकतील.

या आदेशानंतर रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवली असल्याचे वृत्त प्रसारित झाले, पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले की, रोहितने अजून कोणताही औपचारिक प्रस्ताव दिला नाही. एमसीएचे मुख्य निवडकर्ते संजय पाटील यांनी सांगितले की, “रोहितकडून अद्याप कोणताही संपर्क मिळालेला नाही, पण जर ते मुंबईकडून खेळले, तर ते संघासाठी आणि तरुण खेळाडूंना चांगले असेल.” बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली रोहित आणि विराटला वनडे मालिकेपूर्वी फिट राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे, त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

विजय हजारे ट्रॉफी(Trophy) २४ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२६ पर्यंत होणार आहे, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २६ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी निश्चित निवड होण्यास कोणतीही शंका नाही; ही मालिका ३० नोव्हेंबरपासून तीन सामन्यांसह सुरु होणार आहे. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन त्यांच्या वाढत्या वय आणि अलिकडच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत, पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे निवड समिती पुन्हा त्याच्या फॉर्मबद्दल विचार करत आहे.

हेही वाचा :

EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! ₹७ लाखांपर्यंतचा विमा मिळणार मोफत
मला घोडे लावा… लेकीच्या कपड्यांच्या बातम्या पाहून भडकले इंदूरीकर महाराज
पोस्ट ऑफिस आता पॉकेटमध्ये! घरबसल्या मिळतील या सेवा…