भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वात मोठी नावे म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या चर्चेत आहेत. दोघेही आता टीम इंडियासाठी फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळतात, आणि बीसीसीआयने नुकतेच या दोघांसह सर्व सीनियर खेळाडूंना स्पष्ट आदेश दिले आहेत की, जर वनडे संघात आपले (declaration)स्थान कायम ठेवायचे असेल, तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या राज्य संघासाठी खेळणे बंधनकारक आहे.अहवालानुसार, बीसीसीआयच्या सूचनेनंतर रोहित शर्माने कोणताही विलंब न करता मुंबई क्रिकेट असोसिएशनला आपली उपलब्धता कळवली आहे.

त्याने सांगितले आहे की तो विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी तयार आहे. एवढेच नाही, तर 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीही रोहितने आपली उपलब्धता जाहीर केली आहे.दुसरीकडे, विराट कोहलीबद्दल मात्र अजूनही अनिश्चितता कायम आहे. तो सध्या लंडनमध्ये आहे आणि दिल्ली संघासाठी खेळण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

टीम इंडियाचे हे दोन स्टार खेळाडू आता टी-20 आणि कसोटी फॉरमॅटमधून बाजूला झाले आहेत. त्यामुळे त्यांची फिटनेस, फॉर्म आणि मैदानावरील टच टिकवण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी हा एकमेव पर्याय आहे. बोर्डाने दोघांनाही स्पष्ट सांगितले आहे की, “भारतासाठी खेळायचे असल्यास घरगुती क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे(declaration).” बीसीसीआयला अपेक्षा आहे की दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर आणि न्यूझीलंड मालिकेपूर्वी दोघेही किमान तीन ते चार विजय हजारे सामने खेळतील.भारत 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात होईल. या मालिकेनंतर 11 ते 18 जानेवारीदरम्यान भारत न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे सामने खेळणार आहे.

बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, “आता दोघेही दोन फॉरमॅटमधून निवृत्त झाले असल्याने, त्यांना सामन्याची सवय आणि फिटनेस कायम ठेवण्यासाठी घरगुती क्रिकेट खेळणे अत्यावश्यक आहे. रोहितने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की विराटदेखील लवकरच आपली उपलब्धता कळवेल.”अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत दोघांनी टीम इंडियासाठी पुनरागमन केले होते. रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आणि प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. तर विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांत अपयश मिळवले, पण तिसऱ्या सामन्यात नाबाद 87 धावा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

आता सगळ्यांचे लक्ष विराट कोहलीकडे आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर तो लंडनहून भारतात परत येतो का, आणि दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफी खेळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर तो खेळला नाही, तर त्याच्या वनडे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.रोहितने दिलेला सकारात्मक प्रतिसाद दाखवतो की तो अजूनही भारतीय संघासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पण विराट कोहलीच्या निर्णयाची प्रतीक्षा आता केवळ चाहत्यांनाच नाही, तर बीसीसीआयलाही लागली आहे.

हेही वाचा :

वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या
‘या’ सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा…
पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?