भारतीय जेवणातील मसाल्यांमध्ये वेलचीला (Cardamom)विशेष स्थान आहे. तिच्या सुगंधाने आणि चवीने अन्नाला एक वेगळी ओळख मिळते, मात्र वेलचीची फळंच नव्हे तर तिची पानेदेखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अनेक आयुर्वेद तज्ञ आणि आरोग्यविशेषज्ञ सांगतात की दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलचीची पाने चघळल्याने पचनक्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर डिटॉक्सिफाय होते.

वेलचीच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस यांसह व्हिटॅमिन C, B1, B2, B3 आणि B6 सारखे अनेक पोषक घटक असतात. हे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात तसेच त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतात. वेलचीच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने त्वचेवरील सूज, डाग आणि कोरडेपणा कमी होतो.

इन्स्टाग्रामवरील हिमांशू भट्ट यांच्या पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार, वेलचीची पाने वेलचीप्रमाणेच फायदेशीर आहेत. ही पाने चहामध्ये(Cardamom) किंवा स्वयंपाकात घालता येतात, ज्यामुळे चवीत आणि सुगंधात भर पडते. तसेच सकाळी ही पाने चघळल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि दिवसभर ताजेतवानेपणा जाणवतो.

वेलचीची पाने पचनसंस्थेसाठीही उपयुक्त आहेत. त्या पाचक एन्झाइम्सना सक्रिय करून गॅस, आंबटपणा आणि अपचनासारख्या समस्या कमी करतात. नियमित सेवनाने पोट हलके राहते आणि अन्न सहज पचते. याशिवाय वेलचीतील घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि खोकला, सर्दी व घशातील खवखव कमी करतात.

तथापि, तज्ञांच्या मते वेलची किंवा तिची पाने अति प्रमाणात सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात सेवनामुळे पोटात जळजळ, अॅसिडिटी किंवा उलटीची समस्या निर्माण होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये वेलचीमुळे अॅलर्जी होऊन त्वचेवर पुरळ किंवा खाज सुटू शकते. तसेच गर्भवती महिलांनी वेलचीचे अतिसेवन टाळावे.म्हणूनच, वेलचीचे आणि तिच्या पानांचे सेवन मर्यादित प्रमाणात व नियमितपणे केल्यास शरीर निरोगी, त्वचा सुंदर आणि मन प्रसन्न राहते.

हेही वाचा :

‘या’ सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा…
पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?
दिल्ली स्फोटानंतर छतावर आढळला तुटलेला हात..