दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाला(blast) आता तीन दिवस उलटले असले तरी, त्या घटनेचे भयावह परिणाम अजूनही लोकांच्या मनातून पुसले गेलेले नाहीत. दररोज नवे खुलासे समोर येत आहेत आणि आज पुन्हा एकदा असा तपशील समोर आला आहे, ज्यामुळे प्रत्येकाच्याच अंगावर काटा आला आहे. स्फोटाच्या ठिकाणापासून तब्बल 500 मीटर अंतरावर एका इमारतीच्या छतावर तुटलेला मानवी हात आढळला आहे. या दृश्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ एका i20 कारमध्ये भीषण स्फोट झाला. काही सेकंदांत परिसर दणाणून गेला आणि आजूबाजूच्या लोकांचे अक्षरशः चिंधड्या उडाल्या.स्फोट एवढा तीव्र होता की तीन दिवस उलटून गेल्यानंतरही शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी सापडत आहेत. लाल किल्ल्याजवळील न्यू लाजपत राय मार्केटमधील एका इमारतीच्या छतावर तुटलेला हात सापडला आणि त्या क्षणी उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले.

हात आढळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी च्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आणि हाताचा नमुना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, स्फोटाच्या तीव्रतेमुळे शरीराचे तुकडे अनेक मीटर अंतरावर उडाले असावेत. स्फोटामुळे केवळ वाहनांचाच नाही तर जवळच्या दुकानांनाही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या 12 लोकांच्या शवविच्छेदन अहवालातून स्फोटाच्या भीषणतेची कल्पना येते. मृतांच्या हाडांचे तुकडे, कानाचे पडदे आणि फुफ्फुसे फाटलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मृतांच्या शरीरातील अंतर्गत अवयव स्फोटाच्या दाबामुळे फाटलेले आढळले आहेत. इतकंच नव्हे तर काहींच्या शरीरावर भिंतींना आदळल्याने निर्माण झालेल्या खोल जखमा दिसून आल्या आहेत.

या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. उमर याचा मृत्यूही या स्फोटातच(blast) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारमध्ये सापडलेल्या हाडे आणि दातांच्या डीएनए नमुन्यांची तुलना उमरच्या आईच्या डीएनएशी करण्यात आली आणि ती पूर्णपणे जुळल्याचे तपासात सिद्ध झाले. त्यावरूनच उमर स्फोटाच्या वेळी कारमध्ये असल्याचे निश्चित झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उमरनेच या स्फोटाची योजना आखली होती.

तपासात हेही समोर आले आहे की या स्फोटाशी संबंधित चॅटमध्ये दहशतवाद्यांनी ‘मेजवाणीसाठी बिर्याणी’ हा कोडवर्ड वापरला होता, जो या स्फोटाशी संबंधित योजना दर्शवतो. या संवादातूनच पोलिसांना त्यांच्या नेटवर्कबाबत महत्त्वाच्या सुत्रांचा मागोवा घेता आला आहे.

हेही वाचा :

इंदुरीकर महाराज धक्कादायक निर्णय घेणार! दिला ‘हा’ मोठा इशारा
अजित दादा सत्तेत असताना चौकशी निपक्षपाती होईल?
डिस्चार्जनंतर कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती? रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सोडंल मौन