कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) अंतर्गत चालवली जाणारी कर्मचारी ठेव संलग्न विमा(insurance) (ईडीएलआय) योजना खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते. या योजनेअंतर्गत सेवा कालावधीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारस किंवा नामनिर्देशित व्यक्तीला ७ लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाते. ईडीएलआय कायदा १९७६ अंतर्गत ही योजना राबवली जाते आणि त्याअंतर्गत मृताच्या वारसांना किंवा नामनिर्देशित व्यक्तींना लाभ मिळविण्यासाठी ईपीएफओ आयुक्तांकडे लेखी अर्ज करावा लागतो, ज्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.

योजनेनुसार सेवा सुरू झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्याआधी मृत्यू झाल्यास किमान ५० हजार रुपये मिळतात, तर सामान्यतः २.५ लाख ते ७ लाख रुपयांपर्यंत रक्कम लाभार्थ्यांना मिळते. फेब्रुवारी २०२५ मध्ये ईडीएलआय योजनेत सुधारणा केली गेली असून, आता नोकरी बदलल्यानंतर दोन महिन्यांचा अंतर असला तरीही तो सेवा कालावधीतील खंड मानला जाणार नाही. पूर्वी नोकरीतील थोड्याशा खंडामुळेही लाभ नाकारला जात होता.

विमा (insurance)लाभ मिळविण्यासाठी मृताच्या वारसांनी किंवा दावेदारांनी ईपीएफओ आयुक्तांकडे फॉर्म ५ आयएफसह अर्ज करावा लागतो. अर्जासोबत सदस्याचे मृत्यू प्रमाणपत्र, अल्पवयीन मुलाच्या वतीने अर्ज करत असल्यास पालकत्व प्रमाणपत्र, कायदेशीर वारसाने दावा केल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि बँक खात्याचा तपशील व धनादेशाची प्रत सादर करावी लागते. तसेच मृत सदस्याचा गत १२ महिन्यांचा पीएफ तपशील जोडावा लागतो. आवश्यक खातरजमा नंतर अर्ज सादर केल्यावर वीस दिवसांच्या आत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेमुळे वारसांना कठीण काळात आर्थिक मदत मिळते आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षिततेची खात्री होते.

हेही वाचा :

मला घोडे लावा… लेकीच्या कपड्यांच्या बातम्या पाहून भडकले इंदूरीकर महाराज
पोस्ट ऑफिस आता पॉकेटमध्ये! घरबसल्या मिळतील या सेवा…
हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर