मुंबईतील दक्षिण भागातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ऑपेरा हाऊस परिसरातील एका घरात काम करणाऱ्या महिलेवर त्याच घरातील ड्रायव्हरने बलात्कार(hotel) करून तिचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने अखेर धैर्य दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील माता रमाबाई परिसरातील ऑपेरा हाऊस भागात ही महिला घरकाम करत होती. त्याच घरातील घरमालकाच्या ड्रायव्हरशी तिची ओळख झाली आणि हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली. दोघेही एकाच गावातील असल्याने जवळीक आणखी वाढली. मात्र, या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने अत्यंत नीच कृत्य केले.

ड्रायव्हरने महिलेची फसवणूक करत तिला एका हॉटेलमध्ये(hotel) बोलावलं आणि अमली पदार्थ मिसळलेलं पेय दिलं. ते पिल्यानंतर महिला बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती नग्न अवस्थेत होती आणि आरोपीने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. त्यानंतर त्याने महिलेचे फोटो डिलीट करण्याऐवजी तिला ब्लॅकमेल करून तिच्या खात्यातील ८५,००० रुपये लुटले.महिला भीतीपोटी काही काळ गावी परत गेली, मात्र आरोपी तिला सतत फोन करून धमकावत राहिला. १९ ऑगस्ट २०२५ रोजी त्याने पुन्हा तिला त्याच हॉटेलमध्ये बोलावून जुने फोटो दाखवत दुसऱ्यांदा बलात्कार केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातही त्याने वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्ती केली. अखेर त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत धाव घेतली.
तक्रार दाखल होताच पीएसआय अनिल राठोड आणि इन्स्पेक्टर वासंती जाधव यांच्या पथकाने वाळकेश्वर परिसरातून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलिस आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे इतर महिलांना लक्ष्य केले आहे का, याचा शोध घेत आहेत.या घटनेने मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, धमकी आणि जबरदस्तीने पैसे उकळल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा :
आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
“मी खेळणारच!” रोहित शर्माची ठाम घोषणा…