कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार उघडकीस आले आहेत. शाहु महाराजांचा वारसा सांगणाऱ्या शहरात असे प्रकार घडत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात चुटकी वाजवून भूतबाधा (Ghosting)उतरवण्याचा दावा करणारा मांत्रिक दिसतोय. अनेक नागरिक या भोंदुबाबाच्या जाळ्यात अडकले आहेत.

धक्कादायक म्हणजे या भोंदू बाबा मांत्रिकांचा जिल्हासह कोल्हापूर शहरावरही वचक आहे. स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक आघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणासह करणी केली जात आहे.

मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानात जाऊन भूत काढणे, करणी करण्याचे प्रकार उघड होत आहे. पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार उघडकीस आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी करण्याचे प्रकारात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही कोल्हापुरात असाच एक अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पतीला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून स्मशानात (Ghosting)बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद ठेवला होता. त्या कागदात चिठ्ठीत आणखी तिघांची नावं लिहून त्यांच्या आयुष्याची भट्टी लागवी म्हणजेच वाट लावावी असेही लिहिलं होतं.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल…
अजित पवार-शरद पवारांची युती होणार? बड्या नेत्याने दिले संकेत
पेन्शनर्सना मोठा धक्का बसणार…