भारतीय टपाल खात्याने(Post office) नागरिकांसाठी डिजिटल सेवांचा अनुभव सुलभ करण्यासाठी Dak Seva 2.0 मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. या नव्या ॲपच्या माध्यमातून ग्राहक आता पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत उभे राहण्याची गरज न पडता घरबसल्या विविध सेवा वापरू शकतील. मोबाईलवरूनच मनी ऑर्डर पाठवणे, पार्सल ट्रॅक करणे, पोस्टल विम्याचा हप्ता भरणे आणि इतर पोस्टल सेवा उपलब्ध होतील, असा दावा टपाल खात्याने केला आहे.

टपाल खात्याच्या सोशल मीडिया विभागाने ॲपची माहिती X प्लॅटफॉर्मवर शेअर केली असून, नागरिकांना आता स्पीड पोस्ट, रजिस्ट्री, मनी ऑर्डर आणि पोस्टल विमा हप्त्यांसाठी सहजपणे डिजिटल सुविधा मिळणार आहेत. पार्सल ट्रॅकिंग फिचरच्या मदतीने कोणतेही पार्सल किंवा स्पीड पोस्ट कुठे पोहचले आहे याची माहिती एका क्लिकवर मिळेल, तर पोस्टल फी कॅलक्युलेटरमुळे विविध सेवांसाठी लागणारा खर्च लगेच जाणून घेता येईल.
त्याचप्रमाणे, PLI/RPLI पेमेंट फीचरसह पोस्टल (Post office)लाईफ इन्शुरन्स हप्त्यांचे भरणे देखील घरबसल्या करता येईल. ॲपमध्ये Complaint Management System दिला गेला असून, नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात आणि त्यावर चालू कारवाईची माहिती देखील पाहू शकतात.
Dak Seva 2.0 हे ॲप देशातील 23 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून, हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली, तामिळ, गुजराती यासह इतर स्थानिक भाषांचा पर्याय आहे. यामुळे ॲप सर्वसामान्य नागरिकांसाठी सोपे आणि वापरण्यास सुलभ बनले आहे. नागरिक आता घरबसल्या पोस्टल सेवा डिजिटल पद्धतीने वापरून वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाचवू शकतात.

हेही वाचा :
हॉटेलवर नेलं, अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं, घरकाम करणाऱ्या महिलेवर
आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर