प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र यावेळी कारण त्यांचे कीर्तन नसून, त्यांच्या लेकी ज्ञानेश्वरीचा शाही साखरपुडा आहे. संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये पार पडलेल्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराजांना वारकरी संप्रदायाकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता महाराजांनी घेतलेला(decision) भावनिक निर्णय सर्वांना हादरवणारा ठरला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या लेकी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यात तब्बल दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा, गॉगल घालून कार्यालयात केलेला शाही प्रवेश आणि सोहळ्यातील झगमगाट हे सर्व पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कीर्तनात साधेपणाचा उपदेश देणारे महाराज प्रत्यक्षात इतक्या थाटामाटात सोहळा करतात, अशी टीका अनेकांनी केली. वारकरी संप्रदायातील काही मंडळींनीही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सतत वाढत चाललेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज अखेर बोलले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी तीस वर्षांपासून टीका सहन करत आलोय. पण आता विषय माझ्या कुटुंबापर्यंत गेला आहे. माझ्यापर्यंत टीका झाली तरी चालली असती, पण आता माझ्या मुलीवर आणि मुलावर बोलले जात आहे. हे अजिबात योग्य नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “लोक किती खालच्या पातळीवर जात आहेत, हे पाहून मन विषण्ण होतं. माझं जगणंच त्यांनी कठीण केलंय.”
इंदुरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्यात थेट संकेत दिले की ते किर्तन सेवा थांबवण्याचा गंभीर विचार करत आहेत. त्यांनी म्हटलं, “मला आता कंटाळा आला आहे. मी पुढच्या तीन-चार दिवसांत एक व्हिडीओ प्रसिद्ध करणार आहे. कदाचित माझ्या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसेल.” त्यांच्या “फेटा खाली ठेवण्याच्या” वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
गेल्या तीन दशकांपासून इंदुरीकर महाराज(decision) ग्रामीण भागात समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी अनेकदा अंधश्रद्धा, व्यसन आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या विषयांवर जनजागृती केली. त्यांच्या कीर्तनातील विनोदी शैली आणि वास्तवावर भाष्य करणारे मुद्दे लोकांना विचार करायला भाग पाडतात. मात्र आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर झालेल्या टीकेमुळे ते खचलेले दिसत आहेत.

हेही वाचा :
डिस्चार्जनंतर कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती? रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सोडंल मौन
टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी सज्ज, तिलक वर्माकडे नेतृत्व, सामना किती वाजता?
वाघिणीच्या वेशात व्यक्तीने घेतली जंगलात एंट्री; पण वास घेताच भांड उघडलं अन् वाघाने असं काही केलं… थरारक Video Viral