भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असली तरी, त्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील अनऑफीशियल वनडे मालिका 13 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत एकूण तीन सामने(match) खेळवले जाणार आहेत.

या मालिकेत तिलक वर्मा भारत ए संघाचं नेतृत्व करणार असून, दक्षिण आफ्रिका ए संघाचा कर्णधार मार्कस एकरमॅन असेल. पहिला सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना वेळापत्रक

पहिला सामना: 13 नोव्हेंबर (गुरुवार)

स्थळ: निरंजन शाह स्टेडियम, राजकोट

वेळ: दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होईल (टॉस 1 वाजता)

कुठे पाहू शकता सामना?

या मालिकेतील सामने टीव्हीवर प्रसारित होणार नाहीत. मात्र, मोबाईलवर ‘JioHostar’ अॅपद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे प्रेक्षकांना सामना पाहता येईल.

भारतीय संघात संधी मिळालेले प्रमुख खेळाडू

या मालिकेसाठी मुख्य भारतीय संघातील अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुण्याचा ऋतुराज गायकवाड याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दीर्घकाळापासून चांगली कामगिरी करूनही वरिष्ठ संघात स्थान न मिळालेल्या ऋतुराजसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

याशिवाय, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांसारख्या खेळाडूंनाही या मालिकेत संधी देण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे आणि टी20 मालिकेसाठी निवडीचा दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी

ही मालिका तरुण खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची उत्तम संधी आहे. आयपीएलमधील आणि घरगुती क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना (match)आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपल्या कौशल्याची चाचणी देण्याची वेळ आली आहे.

भारत ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील ही मालिका केवळ अनुभव नव्हे, तर भविष्यातील भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ ओळखण्याची मोठी संधी ठरणार आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! अदिती तटकरेंनी ‘या’ महिलांना दिला दिलासा
‘एक पत्नी मिळवून द्या, मला पण…’, शरद पवारांना तरुणाचं पत्र..
तुमचीही सारखी झोपमोड होतेय? ही सवय तुमच्या हृदयासाठी ठरु शकते घातक