राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(sisters) योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, ज्या महिलांचा पती आणि वडील नाहीत, अशा लाभार्थी महिलांसाठी खास बदल करण्यात येणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी करताना महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन, तर कधी ओटीपी न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बदल सुरू आहेत. त्यामुळे काही वेळ लागू शकतो, पण कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही.”

अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ज्यांच्या आयुष्यात ना पती आहेत ना वडील आहेत, अशा महिलांसाठी प्रणालीत विशेष सुधारणा केली जात आहे. सरकारकडून या लाभार्थी महिलांच्या (sisters)पात्रतेची नोंद व्यवस्थित व्हावी म्हणून अतिरिक्त पडताळणी प्रक्रिया लागू केली जाणार आहे. त्यांनी सांगितले की, “ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि कोणालाही या योजनेपासून वगळले जाणार नाही.”त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. “विरोधक आपली मते व्यक्त करत असतात. मात्र अजितदादांनी 24 तासांच्या आत स्पष्टीकरण दिलं आहे. राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,” असं अदिती तटकरे यांनी म्हटलं. तसेच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वादही घेतल्याचं सांगितलं.

दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणारी ही योजना सध्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दिली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता, मात्र दिवाळीपूर्वी अपेक्षित असलेला पुढचा हप्ता अद्याप काही लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की ई-केवायसी न करता पुढील (16 वा) हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे लाभार्थींनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करावी. राज्य सरकारने यासाठी अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 निश्चित केली आहे.

हेही वाचा :

‘एक पत्नी मिळवून द्या, मला पण…’, शरद पवारांना तरुणाचं पत्र..
तुमचीही सारखी झोपमोड होतेय? ही सवय तुमच्या हृदयासाठी ठरु शकते घातक
चीन आणि तिबेटला जोडणारा ‘Hongqi Bridge’ पडल्यानंतर बनला जगभरात चर्चेचा विषय; VIRAL VIDEO मुळे माजली खळबळ