हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे व्यस्त वेळापत्रक, वाढता ताणतणाव आणि कॅफिन किंवा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे अनेक लोकांना त्यांच्या झोपेच्या दिनचर्येशी तडजोड करावी लागते. रात्री अचानक जाग येणे अथवा झोपेत व्यत्यय येणे हे तुमच्या हृदयावर वाईट परिणाम करू शकते. जरी एकुण तास मोजल्यास ते पुरेसे वाटत असले तरी, योग्य दर्जाची झोप न मिळाल्याने एखाद्याच्या हृदयावर ताण येऊ शकतो. झोपेच्या (sleep)दरम्यान, शारीरीक हलचाल मंदावते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला विश्रांती मिळते.

जेव्हा या विश्रांती प्रक्रियेत अडचण येते तेव्हा मज्जासंस्था सतर्क राहते आणि कॉर्टिसोल आणि अ‍ॅड्रेनालाईन सारखे तणाव संप्रेरक जास्त प्रमाणात स्रवतात. कालांतराने यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाची गती वाढणे आणि जळजळ होते जे ऱ्हदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात आणि हृदयरोगाची होण्याची शक्यता वाढते. विविध अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की स्लीप एपनिया किंवा निद्रानाश असलेल्या लोकांना झोपेची समस्या उद्भवते (सतत झोपमोड होणे किंवा सलग झोप न मिळणे) , त्यांना उच्च रक्तदाब, एरिथमिया, स्ट्रोक आणि अगदी हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

शांत झोप न मिळण्याची सामान्य कारणे म्हणजे तणाव, चिंता, झोपेच्या (sleep)वाईट सवयी, वाढता स्क्रीन टाईम, रात्री उशिरा कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि स्लीप एपनिया सारख्या वैद्यकीय समस्या. यामुळे सकाळच्या वेळी डोकेदुखी, दिवसा थकवा, मूड स्विंग किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण यासारख्या इतर लक्षणं झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणतात.

प्रत्येकाने योग्य दिनचर्येचे पालन करून रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटीही झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा पाळाव्यात. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे, स्क्रीन टाईम मर्यादित करणे आणि दिर्घ श्वास घेणे किंवा मेडिटेशन करणे यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. झोप येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे, वाचन करणे किंवा सौम्य संगीत ऐकु शकतात.

ज्या व्यक्ती जास्त घोरतात किंवा श्वास घेण्यासाठी झोपेतून (sleep)उठतात त्यांनी स्लीप एपनियासारख्या झोपेच्या विकारांसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि वेळीच उपचार सुरू करावेत.प्रत्येकाने झोपेला प्राधान्य देणे आणि हृदय आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. झोपमोड होणे हे कालांतराने तुमच्या हृदयाला कमी तास झोपण्यापेक्षाही जास्त हानी पोहोचवते, त्यामुळे जास्तीत जास्त ८ तास चांगल्या दर्जाची झोप घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

देशातली सर्वात स्वस्त कार, आयफोनच्या किमतीत आणा घरी…
चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral
गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च हसत हसत दिले हेल्थ अपडेट म्हणाला, ”डॉक्टरांनी मला..”