बॉलीवूड अभिनेता गोविंदा काल रात्री त्याच्या घरी बेशुद्ध पडला आणि त्याला मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्याचे मित्र ललित बिंदल यांनी सांगितले. तर आता अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज (hospital)देण्यात आला आहे आणि तो बरा आहे. गोविंदाने स्वतः त्याला काय झाले आणि तो आता त्याची तब्येत कशी आहे या बदल अपडेट दिली आहे.

माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणाला, मी ठीक आहे…तुम्हा सगळ्यांचा मी आभारी आहे”, असं म्हणत गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. हॉस्पिटलमधून(hospital) डिस्चार्ज दिल्यानंतर गोविंदाने मीडियाशी संवाद साधला. “मी खूप व्यायाम केल्याने मला चक्कर आली.योगा-प्राणायम चांगलं आहे. पण, खूप व्यायाम कठीण गोष्ट आहे. मी माझी पर्सनालिटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी मला औषधं दिली आहेत”

दरम्यान, गोविंदाचे जवळच्या मित्राने माध्यमांना सांगितले की, अभिनेत्याला न्यूरोलॉजिस्टला भेटण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याला खूप डोकेदुखी होती. डॉक्टरांनी अनेक चाचण्या केल्या आणि त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवले. मित्र ललित बिंदल यांनी खुलासा केला की, गोविंदा त्या रात्री बेशुद्ध झाला तेव्हा सुनीता आणि मुलगी टीना घरी नव्हत्या. सुनीता एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून निघाली होती, तर टीना आहुजा चंदीगडमध्ये होती. टीना संध्याकाळपर्यंत परत येईल, पण सुनीता परतली आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! स्मशानभूमी आणि घरात बायकांना झोपवून चुटकी वाजवायचा अन्….
काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल…
अजित पवार-शरद पवारांची युती होणार? बड्या नेत्याने दिले संकेत