बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात(health) दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे — 12 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.डॉ. प्रतित समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी साडेसात वाजता डिस्चार्ज देण्यात आला, आणि कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू ठेवले जाणार आहेत.

धर्मेंद्र यांना 10 नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांतच सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.मात्र, ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी स्वतः या अफवांना खोडून काढत सांगितलं की, “बाबा उपचाराखाली आहेत आणि आता प्रकृती स्थिर आहे.”
डॉ. समदानी यांनी सांगितलं, “धर्मेंद्र यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल तसेच पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी त्यांना घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य ज्या घरात घालवलं आहे, त्याच वातावरणात राहावं अशी कुटुंबियांची इच्छा होती.”डॉक्टरांनी सांगितलं की, कठीण काळात संपूर्ण देओल कुटुंब धर्मेंद्र (health)यांच्या सोबत खंबीरपणे उभं होतं. सनी आणि बॉबी दोघेही रुग्णालयात सतत उपस्थित राहून आपल्या वडिलांची सर्वतोपरी काळजी घेत होते.
कुटुंबाने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर धर्मेंद्र यांना घरी हलविण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या राहत्या घरी सर्व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली असून, डॉ. समदानी आणि त्यांची टीम दररोज तपासणीसाठी घरी पोहोचत आहे.धर्मेंद्र यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांनी देशभरातून आणि परदेशातूनही चिंता व्यक्त केली होती. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं ऐकून सर्वत्र दिलासादायक वातावरण आहे.धर्मेंद्र हे आजही लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात — मग ते ‘शोले’चा वीरू असो किंवा ‘धरम वीर’चा योद्धा. त्यांच्या तब्येतीसाठी आजही सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

हेही वाचा :
टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी सज्ज, तिलक वर्माकडे नेतृत्व, सामना किती वाजता?
वाघिणीच्या वेशात व्यक्तीने घेतली जंगलात एंट्री; पण वास घेताच भांड उघडलं अन् वाघाने असं काही केलं… थरारक Video Viral
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! अदिती तटकरेंनी ‘या’ महिलांना दिला दिलासा