टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयाने सुरूवात केली. पहिल्याच सामन्यात (Team India) भारताने अमेरिकेला पराभूत केलं. या सामनयात अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. पण त्याची तब्येत बिघडल्याने क्रीडाप्रेमीची धाकधूक वाढली आहे. कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे. त्यात अभिषेक शर्मासारखा बुरूज ढासळणं टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं. पोटात गडबड जाणवत असल्याने त्याने मैदान सोडलं. त्यानंतर मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरलाच नाही. त्यानंतर त्याला थेट रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे लवकर बरा होईल ना अशी चिंता क्रीडाप्रेमींना लागून होती. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे.

अभिषेक शर्माला डिस्चार्ज दिला असला तरी दुसऱ्या सामन्यात खेळेल की नाही हे स्पष्ट नाही. (Team India) नामिबियाविरुद्ध भारताचा दुसरा सामना आहे. या सामन्यानंतर भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे या सामन्यात काहीही करून मोठा विजय अपेक्षित आहे. टीम इंडियाचा फलंदाज तिलक वर्माने एका पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही दिल्लीला आलो तेव्हा तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केलं होतं. आता त्याला डिस्चार्ज दिला आहे. आशा आहे की तो या सामन्यासाठी फीट होईल. अजून आमच्याकडे एक दिवस आहे. यावर उद्या काय तो निर्णय घेतला जाईल.’
अभिषेक शर्मा रिकव्हर झाला नाही तर या (Team India) सामन्यात संजू सॅमसनचं नशिब उघडू शकतं. कारण त्याची जागा संजू सॅमसनला मिळू शकते. इशान किशन सोबत सलामीला उतरेल. संजू सॅमसनची सध्या प्लेइंग 11 मध्ये जागा होत नाही. इशान किशनचा फॉर्म पाहता त्याला बेंचवर बसण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत निराशाजनक कामगिरीमुळे त्याचा प्लेइंग 11 मधून पत्ता कट झाला आहे. पण पुन्हा त्याच्या चाहत्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. जर त्याला संधी मिळाली आणि मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला, तर त्याला पुढे संधी मिळण्याची शक्यता वाढेल.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी