केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांविरोधात देशभरात (dissatisfaction) असंतोषाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ गुरुवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी संयुक्तपणे हा बंद पुकारला असून शेतकरी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनीही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे (dissatisfaction) कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या सुधारणांमुळे रोजगाराच्या संधी कमी होतील, कामगारांचे संरक्षण कमी होईल आणि उद्योगपतींना अधिक स्वातंत्र्य मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रातील भाजप सरकारचे धोरण शेतकरी आणि कामगारविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही माहिती दिली.
या भारत बंदमध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या दहा केंद्रीय कामगार संघटनांचा सहभाग असणार आहे. चार नवीन कामगार संहितांमुळे कर्मचाऱ्यांचे अधिकार मर्यादित होत असल्याचा आरोप करत या संघटनांनी व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे या बंदची व्याप्ती आणि प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, देशभरातील शाळा आणि महाविद्यालये (dissatisfaction) बंद ठेवण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. मात्र केरळ, कर्नाटक आणि ओडिसा या राज्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक तीव्र जाणवू शकतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून काही ठिकाणी शैक्षणिक संस्था खबरदारी म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. 12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाजही काही प्रमाणात विस्कळीत होऊ शकते, कारण बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. तथापि, रिझर्व्ह बँक किंवा संबंधित बँकांनी अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नसली तरी व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी