वाढत्या महागाईच्या काळात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणं अनेकांसाठी कठीण होतंय. मात्र, कॅनरा बँकेनं गृहखरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेनं(bank) आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) मध्ये ५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.०५% नी कपात केली आहे. या निर्णयामुळे होम लोन, ऑटो लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार असून ग्राहकांचा ईएमआय कमी होईल. हे नवे दर १२ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

कॅनरा बँकेच्या(bank) या निर्णयाचा थेट फायदा फ्लोटिंग रेट लोन घेतलेल्या ग्राहकांना होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाचं ₹३० लाखांचं होम लोन २० वर्षांच्या कालावधीसाठी असेल, तर व्याजदरात ०.०५% कपातीमुळे दरमहा सुमारे ₹१५० ते ₹२०० पर्यंत बचत होऊ शकते.
बँकेनं जाहीर केलेले नवीन MCLR दर पुढीलप्रमाणे आहेत:
ओव्हरनाईट MCLR: ७.९०% (पूर्वी ७.९५%)
एक महिन्याचा MCLR: ७.९५% (पूर्वी ८.००%)
तीन महिन्यांचा MCLR: ८.१५% (पूर्वी ८.२०%)
सहा महिन्यांचा MCLR: ८.५०% (पूर्वी ८.५५%)
एक वर्षाचा MCLR: ८.७०% (पूर्वी ८.७५%)
दोन वर्षांचा MCLR: ८.८५%
तीन वर्षांचा MCLR: ८.९०%
दरम्यान, बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय बँक यांनी त्यांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. BoB आणि IDBI या दोन्ही बँकांचा एक वर्षाचा MCLR सध्या ८.७५% वर कायम आहे.
तज्ञांच्या मते, MCLR मध्ये झालेली ही कपात कर्जदारांसाठी आर्थिक दिलासा ठरू शकते. यामुळे ग्राहकांना कमी व्याजदरावर कर्ज घेणं किंवा विद्यमान ईएमआय कमी करणं शक्य होईल. त्यामुळे, घर घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :
पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?
दिल्ली स्फोटानंतर छतावर आढळला तुटलेला हात..
इंदुरीकर महाराज धक्कादायक निर्णय घेणार! दिला ‘हा’ मोठा इशारा