आपल्या मेहनतीने जमा केलेल्या पैशांवर अधिक व्याज, चांगली तरलता आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत असतात. पारंपरिक बँक एफडीपेक्षा अधिक फायदेशीर योजना बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात गुंतवणूकदारांना उच्च परतावा आणि सुरक्षिततेचा समतोल मिळतो. अशाच सात उत्तम गुंतवणूक पर्यायांकडे सध्या गुंतवणूकदारांचे (invest)लक्ष वेधले जात आहे.

अल्पकालीन गुंतवणुकीसाठी ट्रेझरी बिले (टी-बिल्स) हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. 91, 182 आणि 364 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या या बिलांवर व्याज दिले जात नसले तरी ते कमी किंमतीत विकले जातात आणि मुदतीनंतर पूर्ण रक्कम मिळते. 990 रुपयांमध्ये खरेदी केलेल्या बिलावर मॅच्युरिटीला 1,000 रुपये मिळत असल्याने हे सरकारकडून 100% हमी असलेले सुरक्षित साधन आहे.
याशिवाय रिझर्व्ह बँकेचे 7 वर्षांचे बाँड गुंतवणूकदारांसाठी (invest)आकर्षण ठरत आहेत. सध्या यावर 8.05% व्याज मिळत असून हा दर दर 6 महिन्यांनी अपडेट केला जातो. त्यामुळे बाजारातील व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचा परतावा देखील वाढतो. दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हे बाँड उत्तम पर्याय आहेत.कंपन्यांकडून जारी केलेले कॉर्पोरेट बाँड 9% ते 11% पर्यंत परतावा देत असून ते बँक एफडीपेक्षा खूपच जास्त फायदेशीर आहेत. मात्र कंपनी डीफॉल्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी गुंतवणूक करताना AAA, AA किंवा A रेटिंग तपासणे आवश्यक आहे.
तर कॉर्पोरेट एफडी देखील गुंतवणूकदारांना अधिक व्याज देतात. बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स आणि मुथूट कॅपिटलसारख्या एनबीएफसी 8.5% किंवा त्यापेक्षा जास्त व्याज देत आहेत. मात्र या एफडींवर सरकारी विम्याचे कवच नसल्यामुळे केवळ मजबूत क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करणे योग्य याशिवाय सरकारी रोखे देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानले जातात. केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे जोखीम अगदी नगण्य असते आणि सुमारे 7% स्थिर परतावा मिळतो. व्याजदरातील बदलांमुळे त्यांच्या किंमतीत चढ-उतार होऊ शकतात, म्हणून ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वाधिक उपयुक्त आहेत.
सध्याच्या बाजार परिस्थितीत हे पर्याय गुंतवणूकदारांना एफडीपेक्षा अधिक परतावा देऊ शकतात. सुरक्षितता आणि उत्पन्नाचा समतोल साधू इच्छिणाऱ्यांसाठी हे सातही पर्याय आकर्षक ठरत आहेत.

हेही वाचा :
बाल दिनानिमित्त शेअर करा मराठमोळ्या शुभेच्छा,कोट्स आणि whatsapp status
हिवाळ्यात शरीरासाठी लोणचं घातक आहे का? काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ
जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणे शुभ असते की अशुभ?