आजकाल स्वयंपाकघरात(kitchen) नवनवीन प्रकारच्या भांड्यांचा वापर जसा प्रचलित झाला आहे, तसाच मातीच्या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा सुरु झाला आहे. अनेक घरांमध्ये गृहीणींच्या स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यांचा वापर शुभ मानला जातो. हे भांडे फक्त अन्न शिजवण्यासाठीच नाहीत, तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, संपत्ती आणि समृद्धी आणतात.

मातीच्या भांड्यांमध्ये(kitchen) अन्न शिजवल्याने आरोग्य सुधारते आणि घरात आनंद व सुख-समृद्धी टिकते, असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. या भांड्यांमुळे वाईट नजरेचा परिणाम कमी होतो आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये, लग्नाच्या विधींमध्ये किंवा पवित्र कार्यांमध्ये मातीच्या भांड्यांचा वापर आजही केले जातो.

वास्तुनुसार, घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. तसेच घरात तुटलेली भांडी ठेवू नयेत; फक्त नीट आणि स्वच्छ मातीची भांडी वापरणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरात आग्नेय दिशेला मातीच्या फुलांच्या भांड्यांचा समावेश केल्यास समृद्धी वाढते आणि वातावरण अधिक शांत व सकारात्मक राहते. मातीच्या भांड्यांची काळजी हळुवारपणे घेणे, योग्य प्रकारे धुणे आणि सांभाळणे हे देखील महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही?
EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! ₹७ लाखांपर्यंतचा विमा मिळणार मोफत
मला घोडे लावा… लेकीच्या कपड्यांच्या बातम्या पाहून भडकले इंदूरीकर महाराज