आज भारतभर ‘बाल दिन’ (Children’s Day)मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असलेल्या या दिवशी लहान मुलांच्या आनंदाला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जातो. मुलांवर त्यांचे असलेले असामान्य प्रेम लक्षात घेऊन त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ असे संबोधले जाते.

बाल दिन हा दिवस मुलांच्या निरागसतेत दडलेले देशाचे भविष्य उजळवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. शाळांमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम, नाटक, चित्रकला, कविता व निबंध स्पर्धा, खेळ आणि वेशभूषा स्पर्धा यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते आणि हा दिवस आनंद, प्रेम व उत्साहाने भरतो.
शिक्षकही या दिवशी मुलांसाठी विशेष कार्यक्रम सादर करतात; काही ठिकाणी नाटक तर काही ठिकाणी गाणी सादर केली जातात, ज्यामुळे मुलांमध्ये आनंदाची लहरी पसरतात.
बाल दिनाच्या निमित्ताने मुलांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा अशा आहेत:
“हसरा चेहरा, निरागस मन आणि स्वप्नांनी सजलेलं आयुष्य हाच बाल दिनाचा खरा अर्थ आहे!”
“प्रत्येक मूल हे देवाचं सुंदर देणं आहे – त्यांना प्रेम, वेळ आणि आधार द्या. शुभ बाल दिन!”
“छोट्या हृदयात मोठी स्वप्नं बाळगा, कारण आजची कल्पना उद्याचं भविष्य आहे.”
“बालपण संपतं, पण त्यातील हसू आणि आठवणी कधीच जुने होत नाहीत. बाल दिनाच्या शुभेच्छा!”
आजच्या दिवशी सर्वांनी आपल्या आतल्या बालाला जिवंत करावे आणि मुलांच्या आयुष्यात प्रेम, आनंद व आशेची किरणं पसरवावी.
बाल दिनाच्या(Children’s Day) सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा :
हिवाळ्यात शरीरासाठी लोणचं घातक आहे का? काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ
जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणे शुभ असते की अशुभ?
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही?