भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना(match) आजपासून कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार असून, जवळपास पाच वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा भारतात आमनेसामने येत असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 ने ड्रॉ केल्यानंतर आणि वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप करत भारताने दमदार पुनरागमन केले आहे. नवोदित कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाची नजर थेट WTC 2027 फायनलवर आहे.

दुसरीकडे, विद्यमान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघ (match)पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर उत्कृष्ट लयीत आहे. टेन्बा बावुमा WTC 2025 फायनलनंतर पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करत असून, युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल असलेला त्यांचा संघ भारताला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे.पहिला कसोटी सामना आज सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. सामने ईडन गार्डन्स या ऐतिहासिक मैदानावर खेळले जातील.

टेलिव्हिजनवर Star Sports नेटवर्क तर ऑनलाईन JioCinema आणि Hotstar यावर थेट प्रक्षेपण पाहता येईल.भारतीय संघात शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांसारखे अनुभवी खेळाडू असून, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, नितीश रेड्डी यांसारखे तरुण चेहरे संघाचा संतुलन राखत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघात मारको जान्सन, डेवाल्ड ब्रेविस, केशव महाराज आणि एइडन मार्करम यांसारखे दमदार खेळाडू भारतीय गोलंदाजी व फलंदाजीला आव्हान देऊ शकतात.हवामान अनुकूल राहिल्यास चाहत्यांसाठी आजपासून एक रोमांचक कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. घरच्या मैदानावर भारताला हरवणे कठीण असले तरी दक्षिण आफ्रिकेची लढाऊ वृत्ती पाहता ही मालिका पहिल्या दिवसापासूनच चुरशीची ठरणार आहे.

हेही वाचा :

बाल दिनानिमित्त शेअर करा मराठमोळ्या शुभेच्छा,कोट्स आणि whatsapp status
हिवाळ्यात शरीरासाठी लोणचं घातक आहे का? काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ
जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणे शुभ असते की अशुभ?