पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

भारतासह अनेक देशांमध्ये रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ न (artists)राहता सांस्कृतिक आणि नाट्य परंपरेचा एक अविभाज्य भाग बनलेलं आहे. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये रामलीला सादर केली जात असते. परंतू यंदा एक आगळीवेगळी घटना पाकिस्तानात घडली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानसारख्या मुस्लिमबहुल देशात मुस्लिम कलाकारांनी एकत्र येत रामायण नाटक सादर केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आणि नाट्यवर्तुळात या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील कराची आर्ट्स कौन्सिलमध्ये ‘मौज’ (artists)नावाच्या नाट्यसंस्थेने हे नाटक सादर केलं. विशेष बाब म्हणजे, या नाटकात काम करणारे सर्व कलाकार मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी हिंदू धर्मग्रंथावर आधारित एक महत्त्वपूर्ण साहित्यमूळकृती रंगमंचावर सादर केली. या घटनेनं दोन्ही देशांमधील विशेषत म्हणजे भारतात या चर्चेला नवा आयाम दिला आहे.या नाटकाचं दिग्दर्शन योहेश्वर करेरा यांनी केलं असून त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की,रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर तो एका संस्कृतीचा, मूल्यांचा आणि मानवी भावनांचा आरसा आहे. माझ्यासाठी ते रंगमंचावर साकार करणं हा एक जिवंत आणि विलक्षण अनुभव ठरला

या संपूर्ण नाट्यमालिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रभावी वापर करण्यात आला. (artists)पारंपरिक रामलीलेला एका आधुनिक टचसह सादर करताना, ग्राफिक्स, पार्श्वभूमी, संवाद आणि संगीत या सगळ्यांमध्ये एआय तंत्रज्ञान वापरून एक भव्य-दिव्य अनुभव प्रेक्षकांना देण्यात आला. कराचीतील प्रेक्षकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विशेषत म्हणजे नव्या पिढीतील तरुण प्रेक्षकांना ही सादरीकरण पद्धत आकर्षक वाटली. मौज या संस्थेने आधीही विविध सामाजिक विषयांवर आधारित नाटके सादर केली आहेत, मात्र रामायण हे त्यांचं सर्वात धाडसी पाऊल मानलं जात आहे.

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर