आयपीएल २०२६ चा हंगाम सुरु होण्याआधीच मिनी लिलावापूर्वी सर्वात मोठा आणि धडाकेबाज ट्रेड समोर आला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला असून त्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थान रॉयल्सकडे गेले आहेत. या मेगा ट्रेडनंतर संपूर्ण आयपीएलमध्ये खळबळ(Team India) उडाली आहे.

याचदरम्यान काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांनी संजीव गोयंका यांच्या लखनौ सुपर जायंट्ससोबत आणखी एक मोठा ट्रेड डील पूर्ण केला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्सच्या रंगात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ‘लाला’ मोहम्मद शमी आणि सचिन तेंडुलकरचा ‘लाला’ अर्जुन तेंडुलकर हे दोघे एका संघातून मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावात १० कोटी रुपयांना घेतलेला मोहम्मद शमी देखील आता लखनौच्या ताफ्यात समाविष्ट झाला आहे. २०१३ पासून चार वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून ११९ सामने खेळलेल्या शमीने आयपीएल २०२३ मध्ये १७ सामन्यात तब्बल २८ विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली होती. मात्र २०२३ च्या विश्वचषकानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला वर्षभर विश्रांती घ्यावी लागली. पुनरागमनानंतर हैदराबादकडून तो अपेक्षित खेळ करू शकला नव्हता.

दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईऐवजी गोव्यासाठी खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरलाही आयपीएलमध्ये नवी संधी मिळाली आहे. २०२१ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये (Team India)दाखल झालेल्या अर्जुनला २०२३ साली आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली होती, मात्र फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. लखनौ फ्रँचायझीने ३० लाख रुपयांत त्याला ताफ्यात घेतले असून आता या संघात त्याचे करिअर बहरते का, हे पाहणे रोचक ठरणार आहे.

या सलग मोठ्या ट्रेड्समुळे आयपीएल २०२६ हंगामाची रंगत अधिकच वाढली असून लिलावापूर्वीच संघांत मोठे बदल घडू लागल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा :

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेत बदल
मुळ्यासोबत चुकूनही या दोन गोष्टी खाऊ नका…
महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,०००…